Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

लाच घेताना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सचिव जाळ्यात

ट्रॅक्टर अनुदानासाठी लाचेची मागणी

इंदापूर येथील पंधारवाडी सहकारी सोसायटीच्‍या आवारात कारवाई

marathinews24.com

पुणे – नवीन पीक कर्ज मंजूर केल्‍याचे सांगत त्‍याचा मोबदला म्‍हणून २ हजारांची लाच मागत एक हजारांची लाच स्विकारणाऱ्या इंदापूर येथील पंधरवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्‍या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने बेड्या ठोकल्‍या. नाना चंद्रकांत बोराटे (वय ४३, रा. मु. पो. गोकळी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक केलेल्‍याचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय शेतकरणाऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

मनी लॉड्रींगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; जेष्ठेला ९ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती आहे. जिल्‍हा सहकारी बँकेचे असलेले जुने पीक कर्ज २४ मार्च २०२६ रोजी त्‍यांनी भरले होते. त्‍यानंतर त्‍यांनी पंधारवाडी येथील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्‍या माध्यमातून पुणे जिल्‍हा बँकेकडे पीक कर्जासाठी प्रस्‍ताव सादर केला होता. याच सहकारी सोसायटीत बोराटे हा सचिव म्‍हणून नोकरी आहे. दि. ७ एप्रिल रोजी तक्रारदार हे नवीन पीक कर्जाच्‍या प्रस्‍तावाबाबत बोराटेला इंदापूर येथील वडापुरी येथील पुणे जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे भेटले.

यावेळी बोरोटेने तक्रारदार यांना २ लाख ७६ हजार पीक मंजूर झाले असल्‍याचे सांगताना त्‍या बदल्‍यात दोन हजारांची लाच मागितली. पंरतु लाच देणे मंजुर नसल्‍याने ८ एप्रिलला लाच मागणीची पडताळणी होऊन ९ एप्रिल रोजी बोराटेला एक हजारांची लाच घेताना पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्‍या आवारात रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे आणि शैलजा शिंदे यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×