Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

परिवहन वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी प्रक्रिया सुरू

१५ एप्रिल २०२६ रोजी अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे परिवहन (ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू) वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत असून, आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज व लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अमंलबजावणी कार्यशाळा संपन्न – सविस्तर बातमी

खाजगी चारचाकी वाहनांसाठी इच्छुक नागरिकांनी विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट (डीडी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता लिलाव प्रक्रिया पार पडेल.

ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू वाहनांसाठी इच्छुकांनी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसिद्ध करण्यात येईल व त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता लिलाव होईल.

डिमांड ड्राफ्ट “R.T.O., Pune” यांच्या नावे राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेतून काढलेला असावा. लिलावाकरिता डीडी एकाच सीलबंद पाकिटात जमा करणे बंधनकारक आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. राखीव क्रमांक घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी परत मिळणार नाही, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×