Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार

पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांचा दणका

marathinews24.com

पुणे – शहरात अवैध गावठी दारू विक्री करणारे तसेच जुगार खेळणे, संघटित गुन्हेगारी अशा गंभीर प्रकरणातील १० गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी या तडीपारीचे आदेश दिले आहेत.

भोंदूकडून महिलेवर बलात्कार; ५० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

अभिजीत संजय जाधव (वय २९), साईनाथ उर्फ कडूबापु विठ्ठल पाटोळे (वय २७), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६), गगन तानाजी शिंदे (वय २४), संकेत अमोल बांदल (वय २७), मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८), सचिन भिमराव मातंग (वय २५), आदित्य बापु शिंदे (वय २५), बिरा रामदास श्रीराम (वय ३८), मालती संतोष मलके (वय ४५) अशी तडीपार करण्यात आलेल्या १० जणांची नावे आहेत.

तडीपार करण्यात आलेल्यांमधील दहा गुन्हेगारांपैकी चंदननगर पोलिस ठाण्यातील पाच गुन्हेगार आहेत. त्यानंतर लोणीकंद व वाघोलीतील पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन तसेच विमानतळ पोलिस ठाण्यातील एक अशा दहा जणांचा समावेश आहे. शहरातील कायदा व सुव्यव्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहेत. यादरम्यान, जबरी चोऱ्या, गंभीर दुखापत, अवैध हातभट्टी दारू विक्री करणारे तसेच जुगार आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या दहा जणांना पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी शहर व जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश दिले आहेत.

१०० गुन्हेगारांना हद्दपार केले

परिमंडळ सातमधील लोणीकंद, वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव, विमानतळ तसेच येरवडा पोलिस ठाण्यातील एकूण तब्बल १०० गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे. दरम्यान, तडीपार केलेले गुन्हेगार जिल्हा किंवा शहरात दिसून आल्यानंतर तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×