Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

“महिला आरक्षणाला पाठिंबा सांगत प्रत्यक्षात विरोध; ‘इंडिया’ आघाडीचा दुटप्पीपणा”; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचा हल्लाबोल

महिला आरक्षण विधेयक नामंजूर; ‘इंडिया’ आघाडीविरोधात शिवसेना महिला आघाडीचे मुंबईत जोरदार आंदोलन

marathinews24.com

मुंबई – महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत ‘इंडिया’ (INDIA) आघाडीविरोधात जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी करत या विधेयकाच्या निषेधार्थ महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या होत्या.

अक्षय तृतीया व आंबा महोत्सवानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल – सविस्तर बातमी

यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘इंडिया’ आघाडीवर तीव्र टीका करत म्हटले की, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेस व सहयोगी पक्षांनी दुटप्पी भूमिका घेतली. “एकीकडे महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात लोकसभेत विधेयक नामंजूर करण्यासाठी विरोध केला जातो. हा महिलांच्या भावनांचा विश्वासघात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, मतदारसंघ पुनर्रचनेच्या नावाखाली दिशाभूल केली जात असून, महिला सक्षमीकरणाच्या प्रश्नावर खोटा प्रचार करण्यात आला. “महिलांना न्याय देण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी या विधेयकाला अडथळे आणले गेले.”

तसेच, “महिलांच्या मतांचा अधिकार मागणाऱ्यांनी आधी त्यांच्या हक्कांबाबत प्रामाणिक भूमिका घ्यावी. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिलाच योग्य तो निर्णय घेतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी *खासदार श्रीकांत शिंदे यांनी या विधेयकाला स्पष्ट पाठिंबा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सन्मान म्हणजेच महिलांना अधिकार या भुमिकेतुन अनेक योजना आणल्या आहेत. महायुती व एनडीए ची भुमिका महिला सक्षमीकरणाचे आहे.

या उलट युपीए आघाडीने पुतनेची भुमिका घेऊन महिलांना डावलण्याचे विषारी काम केले आहे.कॅांग्रेसने सत्ता असुनही आरक्षण देण्याची ईच्छाशक्ती दाखवली नाही . तंदुरमध्ये जाळलेली नैना ते लातुरची कल्पना गिरींचा खुन , मुस्लीम महिलांच्या अधिकारांचा गळा घोटण्यास शहाबानोच्या निमित्ताने पोटगी नाकारणारे विधेयक, समान नागरी कायद्यात विरोध असा कॅाग्रेसचा दुटप्पी इतिहास पाहिला तर महिलांची फसवणूक एवढेच ते करत असतात.

या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, बेस्ट अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, संजय निरुपम, शिवसेना उपनेत्या कला शिंदे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×