Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

पुण्यात सायबर चोरांकडून ८ जणांची १ कोटी ७० लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ऑनलाईन लुटीचा सपाटा सुरूच

संबंधित पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरांकडून केल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांच्या आर्थिक फसवणुकींचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिक देखील विविध आमिषाला बळी पडून, घाबरून आपले पैसे, बँक डिटेल्स, ओटीपी सायबर चोरांच्या हवाली करत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दाखल फसवणुकीच्या आठ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये १ कोटी ६९ लाख ७५ हजार ४४९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वॅलेंटीना इंडस्ट्रीजवर आर्थिक गुन्‍हे शाखेची छापेमारी – सविस्तर बातमी

वाघोली परिसरातील एका ४१ वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी १६ एप्रिल ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शेअर मार्केटच्या नावाखाली ५३ लाख ३० हजार १८० रुपयांना फसवले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनकवडी ५३ वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी २६ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत इन्शुरन्स कंपनीमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देतो सांगत १८ लाख ३७ हजार ३५२ रुपयांना फसवले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदनगर, सिंहगड रोड येथील ३५ वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी २ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंगचे ट्रान्झेक्शन झाले असून, पोलिस तपासात मदत करण्यास सांगत ३९ लाख २० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाची सायबर चोरांनी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी इन्व्हेस्टमेंट खाते तयार करण्याची थाप मारून २ लाख ५९ हजार ५९७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोरपडी गाव येथील ४६ वर्षीय तक्रारदाराची सायबर चोरांनी २९ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ४ लाख ५५ हजार ७५० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी येथील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरांनी २ सप्टेंबर ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानोरी येथील ६५ वर्षीय

ज्येष्ठाची सायबर चोरांनी २६ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत मनी लाँड्रिंगचे ट्रान्झेक्शन तुमच्या बँक खात्यातून झाल्याची बतावणी करत ७ लाख २३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लोहगाव येथील ६० वर्षीय महिलेची रिझर्वेशनचे टास्क पूर्ण करण्याची बतावणी करत सायबर चोरांनी २२ डिसेंबर २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ३८ लाख ४४ हजार ५७० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फसवणुकींच्या गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×