विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पोलिस अधिकारी असून, प्रांत अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, मी तुझ्या घराचे काम पूर्ण करून देतो असे सांगत एकाने २६ वर्षीय तरुणाची ३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनिवास वामन मदने (रा. प्रजासत्ताक कॉलनी, लेन नं. १, धानोरी) असे आरोपीचे नाव आहे.
पुण्यात सायबर चोरांकडून ८ जणांची १ कोटी ७० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास मदने याने तक्रारदार तरुणाला ४ जानेवारी ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत मी पोलिस अधिकारी आहे, माझी प्रांत अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, तुझे घराचे काम पूर्ण करून देतो असे सांगत ३ लाख ७० हजारांची मागणी केली. तक्रारदाराने सुरूवातील ३ लाख ५० हजार आणि नंतर २० हजार अशा दोन टप्प्यात मदने याला पैसे दिले. त्यानंतर मदने याने तक्रारदाराचे कोणतेही काम न करता, पैसे परत मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. मदने याने दिलेले तीन चेक देखील बाउन्स झाले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुडगे करत आहेत.





















