Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारात बसविलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीतील अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर (वय ३४, रा. वेदविहार सोसायटी, नोबल हाॅस्पिटलजवळ, मगरपट्टा, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोसायटीतील अध्यक्ष, तसेच पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिकाच्या कार्यालयातून १० लाखांची रोकड चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिका सोसायटीच्या आवारात खेळत होती. सोसायटीकडून आवारात लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली आहे. सोसायटीच्या आवारातील लोखंडी घसरगुंडी अनिकाच्या डोके, चेहरा, मानेला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेतील अनिकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सोसायटीच्या आवारातील घसरगुंडी व्यवस्थित बसविली नव्हती. ती काढून टाकण्याबाबत अनिकाचे वडील नवनाथ यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. याबाबत वारंवार तक्रार दिली होती. मात्र, सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही न केल्याने दुर्घटना घडल्याचे अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सोसायटीतील पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×