Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

पुणे रेल्वे स्थानकातील समस्या, सुरक्षाव्यवस्थेची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यांकडून पाहणी

विनातिकीट प्रवाशांचा मुक्त वावर; तपासणी यंत्रणा ढासळलेली

marathinews24.com

पुणे – शहरातील रेल्वे स्थानकाविषयी नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. या पाहणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेत आढळून आलेल्या अनेक गंभीर त्रुटी, समस्या व असुविधांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत असून, याबाबत सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीबाबत खत व बियाणे विक्रेत्यांना प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश – सविस्तर बातमी

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पाहणीदरम्यान स्थानकात विनातिकीट फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळले. स्वतः प्लॅटफॉर्म तिकीट काढून प्रवेश केल्यानंतरही अनेकजण कोणतीही तपासणी न करता परिसरात वावरत असल्याचे दिसून आणले. घटना घडून गेल्यानंतरच त्रुटी लक्षात येतात, ही बाब अत्यंत गंभीर आहे. स्थानक परिसरात व्यसनाधीन व्यक्तींची वर्दळ, दारू व अमली पदार्थांचे सेवन, तसेच चोरी, अत्याचार यांसारख्या घटना वारंवार घडत असून, हे अत्यंत गंभीर आहे. या सर्व प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.”

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाल्याचे समाधान असले, तरी प्रत्यक्षात तपासणी व्यवस्था प्रभावीपणे राबवली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्थानकावर तिकीट तपासणी करणारे अधिकारी (टीसी) अपुरे असल्याने ‘आओ-जाओ, घर तुम्हारा’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली. याशिवाय, स्थानकावरील स्टॉल वाटप प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य दिले जात नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ‘गरजू आणि स्थानिकांना संधी मिळेल अशी यंत्रणा उभी राहू शकते का, याचा विचार व्हायला हवा,’ असे त्या म्हणाल्या.

या सर्व त्रुटींबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश वर्मा यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था तातडीने मजबूत करण्याची गरज असून, याकडे आतापर्यंत दुर्लक्ष करणाऱ्यांना जबाबदार धरले जावे आणि संबंधित रेल्वे व पोलिस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडेही लेखी तक्रार देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक कार्यकर्ते अनिल परदेशी यांनी स्थानकाच्या परिसरातील समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा केला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×