Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

सत्कारासाठी पुष्पगुच्छाऐवजी झाडाचे रोप द्यावे – शशिकांत कांबळे यांची मागणी

पद्मा फाउंडेशनतर्फे महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन

marathinews24.com

पुणे – विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सत्कारासाठी दिल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छांऐवजी झाडांचे रोप देण्याची प्रथा सुरू करावी, अशी मागणी पद्मा फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांनी महापौर मंजुषा नागपूरे, तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले. प्रसंगी विरोधी पक्षनेते ऍड. निलेश निकम, युवा उद्योजक निखिल तांबट व श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे काळूभाऊ चव्हाण उपस्थित होते.

पुणे रेल्वे स्थानकातील समस्या, सुरक्षाव्यवस्थेची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यांकडून पाहणी – सविस्तर बातमी

शशिकांत कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या विविध कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छ देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर रूढ झाली आहे. मात्र, हे पुष्पगुच्छ बहुधा प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असतात आणि काही वेळातच टाकून दिले जातात. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, प्लास्टिक कचऱ्याची समस्या अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर, पुष्पगुच्छांच्या ऐवजी झाडांचे रोप देण्याची पद्धत अवलंबल्यास पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. ‘स्वच्छ, सुंदर व हरित पुणे’ या संकल्पनेलाही बळकटी मिळेल.”

महापालिकेच्या वतीने आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये ही संकल्पना राबविण्याचा पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. गरजू नागरिकांना आणि स्थानिकांना रोपांचे वितरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करता येईल का, याबाबतही विचार करावा. पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×