Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

क्रेन ऑपरेटरवर हल्ला; फायनान्स रिकव्हरी एजंटसह तिघांविरुद्ध गुन्हा

क्रेन ऑपरेटरवर हल्ला; फायनान्स रिकव्हरी एजंटसह तिघांविरुद्ध गुन्हा

हप्ते थकबाकीच्या वादातून मारहाण व अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप

marathinews24.com

पुणे – शहरातील बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाषाण-सुस रोडवरील दुर्गा कॅफेजवळ एका २१ वर्षीय तरुणावर फायनान्स कंपनीच्या कथित रिकव्हरी एजंटसह तिघांनी हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. हप्ते थकबाकीच्या वादातून मारहाण व अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यात सहायक फौजदारासह हवालदार निलंबित – सविस्तर बातमी 

तक्रारदार गिरीष निलेश मोची (रा. म्हाळुंगे, पुणे) हा क्रेन ऑपरेटर असून, त्याच्या वडिलांच्या नावावर असलेली स्प्लेंडर दुचाकी तो वापरत होता. संबंधित वाहनावर फायनान्स कंपनीचे कर्ज असून काही हप्ते थकीत असल्याचे सांगितले जाते.

तक्रारीनुसार, १९ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ‘दिपक’ नावाच्या व्यक्तीने थकबाकीच्या कारणावरून दुचाकी ताब्यात घेतल्याचे फोनवरुन सांगितले. संध्याकाळी हप्ते भरण्यास तयार असल्याचे कळविल्यानंतर तक्रारदाराला पाषाण येथील दुर्गा कॅफेजवळ बोलावण्यात आले. तक्रारदार आपल्या भावासह तेथे पोहोचला असता, आरोपी दिपक व त्याचे दोन साथीदार यांनी दुचाकी परत न देता उलट शिवीगाळ करत कमरेच्या पट्ट्याने व लोखंडी पाईपने मारहाण केली. या हल्ल्यात तक्रारदाराच्या पाठीवर, हातावर व डोक्यावर दुखापत झाली. तसेच साथीदारांनी प्लास्टिक खुर्च्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तक्रारदाराचा लहान भाऊ भीतीपोटी तेथून पळून गेला. आरोपींनी तक्रारदाराला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र तक्रारदाराने स्वतःची सुटका करून घेत बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याला औंध येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×