Breking News
‘वंदे भारत’ रुळावरून घसरलीआंबेडकरी चळवळ कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नाही; पण अन्यायकारक उपवर्गीकरण खपवून घेतले जाणार नाही!बियाणे उत्पादक कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्नरेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून चीज ॲनालॉग वापरासंदर्भात ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारकआला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा – विशेष लेखपुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तस्करांना दणकाबुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीपुण्यात अनधिकृत वास्तव्य, ३ बांग्लादेशी महिला ताब्यातपुण्यात रांका ज्वेलर्सला मॅनेजरनेच घातला १८ कोटींचा गंडापुण्यात मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा

पुण्यात जुन्या वादातून तरुणाचा खून; चौघांना अटक

धायरीत तरुणाच्या डोक्यात बॅट मारून खून

जुन्या भांडणाचा राग जीवावर; धारदार शस्त्राने हल्ल्यात तेजस पिलाणेचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – जुन्या वादातून टोळक्याने तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तेजस दत्तात्रय पिलाणे (वय २४, रा. पार्थदर्शन सोसायटी, मोहननगर, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २५ एप्रिलला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शिवसृष्टी गदा चौकातून कात्रजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर घडली आहे.

चालकाने लांबवले १५ लाखांचे दागिने, आरोपीला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी तेजस पिलाणे याच्या चेहऱ्यावर व शरीरावर धारदार शस्त्राने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी विशाल दत्तात्रय खोपडे (वय २२), अभिषेक दिलीप खोपडे (वय २३), सचिन हिराचंद्र धुळे (वय ४३) आदिनाथ शिवाजी कासबे (वय १९ सर्व रा. आंबेगाव व मंगळेवाडी, कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×