Breking News
Pune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशा

सौ. अंजली चंद्रकांत पाटील यांना ‘गीताव्रती’ पदवीने गौरव

श्रीमद्भगवद्गीतेचे शुद्ध उच्चारण, पाठांतर आणि सखोल अर्थाचा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल गौरव

marathinews24.com

पुणे – कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी सौ. अंजली पाटील यांना ‘गीता परिवार’ या जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित ‘गीताव्रती’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे शुद्ध उच्चारण, पाठांतर आणि सखोल अर्थाचा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल त्यांना ही पदवी बहाल करण्यात येते.

भरतनाट्यम्‌ नृत्याविष्कारातून साकारली ‘श्रीराम-कथा’ – सविस्तर बातमी

सौ. अंजली पाटील या स्वतः एक कॉस्ट ऑडिटर असूनही, त्यांनी व्यस्त कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत गीतेचा सखोल अभ्यास केला. ‘गीता परिवार’ या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्गांच्या माध्यमातून त्यांनी गीतेचे १८ अध्याय पूर्ण केले. केवळ पाठांतर नव्हे, तर गीतेतील कर्मयोग आपल्या आचरणात आणण्यासाठी त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गीता परिवार’ ही संस्था जगभरात गीतेचा प्रचार करत आहे. या संस्थेचा ‘गीताव्रती’ हा एक सन्माननीय टप्पा असून, जो साधक गीतेच्या शुद्ध पठणात नैपुण्य मिळवतो, त्याला ही पदवी दिली जाते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×