Breking News
आंबेडकरी चळवळ कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नाही; पण अन्यायकारक उपवर्गीकरण खपवून घेतले जाणार नाही!बियाणे उत्पादक कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्नरेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून चीज ॲनालॉग वापरासंदर्भात ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारकआला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा – विशेष लेखपुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तस्करांना दणकाबुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीपुण्यात अनधिकृत वास्तव्य, ३ बांग्लादेशी महिला ताब्यातपुण्यात रांका ज्वेलर्सला मॅनेजरनेच घातला १८ कोटींचा गंडापुण्यात मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाईचा बडगाबारामती येथे पोस्टल पेन्शन अदालतीचे आयोजन

विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंग

डेक्कन पोलिसांकडून ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील एका नामांकित विधी महाविद्यालयातील वसतिगृहात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पाच विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका विद्यार्थ्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी

तक्रारदार ३५ वर्षीय विद्यार्थी एका नामांकित महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आवार, तसेच वसतिगृहात त्रास दिल्याचा तक्रार अर्ज विद्यार्थ्याने डेक्कन पोलीस ठाण्यात नुकताच दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली. विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी संबंधित महाविद्यालयाच्या वसतिगृहास भेट देऊन चैाकशी केली.

प्राथमिक चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी विद्यार्थ्याने विधी महाविद्यालयातील प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्ज दिल्यानंतर महाविद्यालयाने नेमकी कारवाई केली, याची माहिती पोलिसांकडून घेतील जाणार आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात रॅगिंगची घटना घडली होती. रॅगिंगच्या घटनेमुळे एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली होती. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शहरातील विविध महाविद्यालयांना शिक्षण विभागाने सूचनाही दिल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×