Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा

पुण्यात मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा

तीन दिवसांत १७१ जणांवर कारवाईच्या जाळ्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, २४ ते २६ एप्रिल कालावधीत तब्बल १७१ मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्ताविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार, गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत बेदरकारपणे वाहने दामटणार्‍यांसह मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने नाकाबंदी केली आहे. ठिकठिकाणी ३३ नाकाबंदी पॉईंट उभारून वाहनांची तपासणी केली जात असून, त्याठिकाणी ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या मदतीने वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईसह पुढील कायदेशीर प्रक्रिया केली आहे

अपघातांचे प्रमाण करणे, बेशिस्तांना धडा

अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्ते सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांमध्ये जबाबदार वाहन चालकाची जाणीव निर्माण करणे हा कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालवणे टाळावे, विरूद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे वाहन चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध वाहतूक विभागाकडून सातत्याने कारवाई करून दंड केला जात आहे. प्रामुख्याने मद्यपान करून वाहन दामटणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरूद्ध ही मोहिम राबवली जात आहे. नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांची काळजी घ्यावी.
हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×