Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात अनधिकृत वास्तव्य, ३ बांग्लादेशी महिला ताब्यात

पुण्यात अनधिकृत वास्तव्य, ३ बांग्लादेशी महिला ताब्यात

कुंटणखान्यासाठी वापरलेले ४ फ्लॅट सील

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती भागातील बुधवार पेठेत कुंटणखान्यासाठी वापरलेले ४ फ्लॅट सील करण्यात आले आहेत. तसेच अनधिकृतपणे वास्तव्य करणार्‍या तीन बांग्लादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित महिला मागील एक महिन्यापासून उदरनिर्वाह चालवण्यासाठी मध्यवर्ती बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करीत असल्याचे उघडकीस आले आहे. जोशना शकुर अली, कुलसुम खातून, अंजुरा बेगम (सर्व रा. बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.

पुण्यात रांका ज्वेलर्सला मॅनेजरनेच घातला १८ कोटींचा गंडा – सविस्तर बातमी 

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरात न्यु वेलकम, बेगम, दाणे आळीतील जुना वाडा इमारतीतील फ्लॅट सिल केला आहे. त्यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात काही दिवसांपुर्वी पोक्सो अ‍ॅक्ट कलम ४, १७ अन्वये गुन्हा दाखल होता. संबंधित गुन्हयामध्ये कुंटणखाना चालविणार्‍यासह जागा उपलब्ध करुन देणार्‍याविरूद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तसेच कुंटणखान्यासाठी वापरलेले फ्लॅट सिल करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी पाठविला होता. त्यानुसार न्यु वेलकम, बेगम, दाणे आळीतील जुना वाडा असे चार फ्लॅट एक वर्षासाठी सीलबंद केले आहेत.

आणखी ३ बांग्लादेशी महिला ताब्यात

रेड लाईट एरियामध्ये बांगलादेशी महिला / पुरुषांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी प्रशांत भस्मे यांच्या माहितीनुसार बुधवार पेठेत ३ बांग्लादेशी महिला अनाधिकृत विनापरवाना हिंदुस्थानात वास्तव्य करीत असल्याचे स्पष्ट झाले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, चंद्रकांत जवळगी, उपनिरीक्षक पुजा जाधव, शिवाजी शिंदे, विशाल शिंदे, गजानन सोनुने, महेश पवार, वसिम शेख, वनिता कांबळे, वैशाली चौगुले यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×