Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

ग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यात

ग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यात

अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

marathinews24.com

पुणे – सर्व सामान्य ग्राहकांच्या समस्या मांडण्याचे काम जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्यावतीने करण्यात येते, ग्राहकांच्या समस्यांची गांर्भीयाने दखल घेवून त्या प्राधान्याने सोडाव्यात, ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन होणार नाही यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने कार्यवाही करावी, जिल्ह्यात अशा सूचना अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी दिल्या.

‘भारताची भीमज्योत’ बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारी – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय तसेच अशासकीय सदस्य, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव महेश सुधाळकर, परिवहन, महावितरण, अन्न व औषध प्रशासन आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी फसवणूक टाळण्याकरिता सायबर विभागाने व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. बिबटप्रवण क्षेत्रात विशेषत: रात्रीच्या वेळी अखंडित पुरवठा राहील, याबाबत महावितरणने कार्यवाही करावी. उर्जा मित्र बैठकीचे आयोजन करुन ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे, या बैठकीत परिषदेच्या सदस्यांनी निमंत्रित करावे. सदस्य सचिवांनी या बैठकीत महसूल विभागाशी निगडीत मांडण्यात आलेले विषय जिल्हाधिकारी कार्यालय येथे दरमहा आयोजित विभाग प्रमुखाच्या बैठकीत ठेवण्यात यावे.

सदस्यांनी ग्राहकांच्या सेवांबाबत मांडलेल्या सूचना विचारात घेता सकारात्क विचार करुन कार्यवाही करण्यात येईल. या सूचनांचा बैठकीच्या इतिवृत्तात समावेश करुन सर्व संबंधित विभाग तसेच सदस्यांना इतिवृत्त उपलब्ध करुन द्यावे. या इतिवृत्तानुसार संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करुन आगामी बैठकीपूर्वी अनुपालन अहवाल सादर करावा. अनुपालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.

यापूर्वीचा बैठकीतही ग्राहकांच्या अडीअडचणीसंदर्भात प्राप्त निवेदनावर संबंधित विभागाना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या बैठकीत परिषदेच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करुन सर्व संबंधित विभागाने अनुपालन अहवाल सादर करावा, असेही राऊत म्हणाले.

यावेळी परिषदेच्या सदस्यांनी ग्राहकांच्या सेवांबाबत सूचना केल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×