Breking News
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहनशिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय

बलात्काराच्या गुन्ह्यात पसार आरोपी लातूरमधून अटकेत

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

भारती विद्यापीठ पोलिसांनी केली कारवाई

marathinews24.com

पुणे – बलात्काराच्या गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपीला लातूर परिसरातून अटक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. हरीओम निवास, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपीने एका युवतीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर युवतीची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती. याबाबत युवतीने फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध मार्च महिन्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोंढव्यात गांजा विकणाऱ्या महिलेसह दोघे अटकेत – सविस्तर बातमी

प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हस्कले पसार झाला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी म्हस्कले हा लातूरमधील खरबवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला लातूर परिसरातून अटक केली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग, सहायक निरीक्षक स्नेहल थोरात, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस कर्मचारी मंगेश पवार, सागर बोरगे, मंगेश गायकवाड, महेश बारवकर, किरण साबळे, मितेश चोरमले, नीलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×