Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात धावत्या कारला लागली आग; मोठी दुर्घटना टळली

सिंहगड रोड परिसरातील स्वामीनारायण मंदिराजवळ घडली घटना

marathinews24.com

पुणे – धावत्या चारचाकी गाडीला अचानक आग लागल्याने गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. सुदैवाने गाडीत कोणीही न अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ही घटना रविवारी (दि. ३ ) रात्री पावणे आठच्या सुमारास सिंहगड रोड परिसरातील स्वामीनारायण मंदिरासमोर घडली आहे. आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अत्याचार प्रकरणाच्या तपासासासाठी विशेष तपास पथक – सविस्तर बातमी

अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी सोपान तोडकर (वय ५२, रा. आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे) हे आपल्या दोन मित्रांसह पाचगणीहून पुण्याकडे येत होते. स्वामीनारायण मंदिराजवळ पोहोचताच गाडीच्या इंजिनने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालक व इतर प्रवासी तात्काळ गाडीतून खाली उतरले. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतल्याने वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस मार्शल, पोलीस निरीक्षक, डीबी पथक, तसेच नरे चौकी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर जळालेली गाडी क्रेनच्या साहाय्याने बाजूला हटवण्यात आली. हायवेवरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे वाहन चालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×