सायबर चोरट्यांकडून तरुणाची १५ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांकडून तरुणाची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३० वर्षीय तरुण हडपसर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर १३ फेब्रुवारी रोजी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची खरेदी-विक्री व्यवहारात चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले.

हडपसरमध्ये वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार – सविस्तर बातमी

चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठविली. या लिंकमध्ये तरुणाला त्याची माहिती देण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात तरुणाने गेल्या दीड महिन्यात वेळोवेळी १५ लाख ३१ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर तरुणाने संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×