Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात चॉकलेटच्या आमिषाने चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न

गणेश पेठेतील दुकानदाराला अटक

marathinews24.com

पुणे – शहरासह जिल्ह्यातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबत नसल्याचे विविध घटनांवरून स्पष्ट झाले आहे. नसरापूरात चिमुरडीवर अत्याचारानंतर खून, पर्वती पायथ्याजवळ आजोबाने नातीवर केलेला अत्याचाराचा प्रयत्न, थेउरमध्ये घराशेजारी राहणार्‍याने चिमुरडीचा केलेला विनयभंग, राजाराम पुलावर तरूणीच्या विनयभंगाची घटना ताजी आहे. असे असतानाच गणेश पेठेतील ४७ वर्षीय दुकानदाराने १० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी (दि.७) संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. मुलीने आरडाओरड करीत सुटका करून घेत कुटूंबियांना माहिती दिल्यामुळे अनर्थ टळला आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध पोक्सोनुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीएमपीलचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या कारचा भीषण अपघात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरूवारी संध्याकाळी सव्वा चार वाजता गणेश पेठेतील दुधभट्टी परिसरात थांबली होती. त्यावेळी परिसरातील दुकानदाराने मुलीला चॉकलेट देतो, असे आमिष दाखवून बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडाओरड करीत स्वतःची सुटका करीत पळ काढला. या घटनेची माहिती तिने आजीला दिली. त्यानंतर कुटूंबियाने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीविरूद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

दुकानदाराने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडाओरड करीत सुटका करून घेत घटनेची आजीला माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली असून, सर्वजण सुरक्षित आहे. कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×