Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

हडपसर परिसरात तरूणावर केले वार, टोळक्याविरूद्ध गुन्हा

ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडी

वानवडी पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुध आणण्यासाठी गेलेल्या तरूणाला चौघाजणांनी बेदम मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना १३ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हडपसर परिसरातील वैदुवाडीतील खजुरे वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरूणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मसाज पार्लरमध्ये देहविक्रयाचा आरोप करुन खंडणी उकळली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण वैदुवाडी परिसरात राहायला असून, १३ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तो दुध आणण्यासाठी दुकानात गेला होता. त्यावेळी चौघांनी त्याला गाठून विनाकारण मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने त्यांच्यावर वार करून जखमी केले आहे. त्यानंतर टोळक्याने तक्रारदाराच्या घरात शिरून पत्नीला शिवीगाळ करीत संसारपयोगी साहित्याची तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे तपास करीत आहेत.

क्रिप्ट्रो करन्सी वॉलेटमधून १० लाखांची चोरी

पुणे- क्रिप्ट्रो करन्सी वॉलेटवर सायबर हल्ला करीत चोरट्याने तब्बल १० लाख रूपयांची आर्थिंक फसवणूक केली आहे. ही घटना २१ एप्रिल ते ७ मे २०२६ कालावधीत बाणेरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बालेवाडीत राहणार्‍या ४२ वर्षीय तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात वॉलेट धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण बालेवाडीत राहयला असून, त्यांचे क्रिप्ट्रो करन्सी वॉलेट आहे. २१ एप्रिल ते ७ मे कालावधीत अज्ञात वॉलेटधारकाने त्यांच्या वॉलेटवर सायबर हल्ला केला. तक्रारदाराच्या वॉलेटच्या ब्लॉकचेन अ‍ॅड्रेस आणि प्रायव्हेट कीचा वापर करीत तब्बल १० लाख रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×