Breking News
विशेष वृत्त – साथी पोर्टल: बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता व विश्वासार्हतेकडे डिजिटल पाऊलदुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूबंगल्यातून २७ लाखांचे दागिने लंपास‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील शिवराज मोटेगावकर यांची चौकशी‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला ‘सीबीआय’ कोठडीदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जापैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकलेपुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयेवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचारपुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला ‘सीबीआय’ कोठडी

पेपरफुटी प्रकरणात जीवशास्त्र अध्यापिकेला १४ दिवसांची ‘सीबीआय’ कोठडी

marathinews24.com

पुणे – देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने चौदा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकले – सविस्तर बातमी

मनीषा मांढरे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. याप्रकरणात त्यांची दिल्लीत चौकशी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतिशास्त्र, तसेच प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता.

बिबवेवाडीतील ब्युटीपार्लर चालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली आहे. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मांढरेला घरी बोलावले होते. तेथे मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती दिली. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर मांढरेला अटक झाली. या प्रकरणात मांढरेला रविवारी दिल्लीतील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपअधीक्षक पवन कुमार यांनी मांढरे हिला विशेष न्यायाधीश रश्मी कुजूर यांच्या न्यायालयात रविवारी हजर केेले.

‘सीबीआय’कडून ॲड. व्ही. के. पाठक आणि दर्शन लाल यांनी बाजू मांडली. ‘या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, तसेच ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारेला अटक करण्यात आली आहे. पेपरफुटी प्रकरणात आरोपींनी संगनमत केले. आरोपी मांढरे ही परीक्षाप्रकियेशी (एनटीए) संबंधित आहे. विशेष मार्गदर्शनाच्या नावाखाली त्यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. परीक्षेतील प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती त्यांना विद्यार्थ्यांना दिली हाेती. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, ‘नीट’ प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे. आरोपींची एकत्र चौकशी करायची आहे. तपासासाठी चौदा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी,‘ अशी विनंती ॲड. पाठक आणि ॲड. लाल यांनी यु्क्तिवादात केली.

‘सीबीआय’च्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश रश्मी कुजूर यांनी मांढरेला चौदा दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ‘

‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून शुक्रवारी अटक केली. कुलकर्णी रसायनशास्त्राचा अध्यापक आहे. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कुलकर्णीची ‘सीबीआय’च्या पथकाने चौकशी केली. चौकशीत मांढरेही या प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ‘सीबीआय’ने तिला अटक केली. यापूर्वी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्यूटी पार्लर चालविणारी मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. ‘सीबीआय’ने देशातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकले. कागदपत्रे, मोबाइल, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त केली होती. जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×