Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही

मैंदवाडी ग्रामस्थांना धमकी; स्व. देशमुख हत्यांकाडातील फरार आरोपी गॅंगची दहशत

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणात आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. आंधळे गॅंगची दहशत अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मैंदवाडी गावातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहत नाही, अशी धमकी गावकऱ्यांना दिली आहे.

क्रिप्टो करन्सीचे आमिष पडले ३० लाखांना – सविस्तर बातमी

धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावातील ग्रामस्थांनी थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पोलीस अधीक्षक नवनीत कॅावत यांची भेट घेऊन आंधळे गॅंगवर कारवाईची मागणी केली आहे. दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा लवकर पर्दाफाश करून मैंदवाडी गावातील ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. बाहेरगावचे लोक बोलवून कासारी पाटी शिवारात कृष्णा आंधळेच्या गॅंगने गावातील प्राणघातक हल्ला केला होता. परत गावामध्ये कुठलाही सार्वजनिक कार्यक्रमात धिंगाणा घालणे, गाड्या पळवणे, शिट्टी मारणे पुन्हा कोणी काय म्हणले की ट्रॅक्टर वर बाप तो बाप रहेगा गाणे लावायचे कुणी विचारायला गेले की त्याला गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बाहेरून गुंड बोलावून गावामध्ये दहशत निर्माण करतात. आज दोन वर्ष झाले आम्ही गावकरी जीव मुठीत धरून जगत आहेत.

गावातील नागरिकांना उदारनिर्वाहासाठी बाहेरगावी जावे लागते त्या लोकांचे बाहेर प्रत्येक गावामध्ये दहा -दहा लोकांबरोबर संपर्क आहेत. त्यामध्ये चोऱ्या करणारे, दरोडे टाकणारे , मारामारी करणारे गुन्हा मधले लोक आहेत. गावातील एखाद्या व्यक्तींनी जर तक्रार केली तर बाहेर चे लोक आणून दबाव टाकून त्याला जीव मारण्याच्या धमकी देतात.

कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. यामधील काही लोक आरोपी कृष्णा आंधळेच्या संपर्कात आहेत. त्यांचा जर सीडीआर काढला तर फरार कृष्णा आंधळे लवकरात लवकर सापडेल आणि या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी मैंदवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×