पुणे पोलिसांचा दणका, कारागृह प्रशासनाला पत्र
marathinews24.com
पुणे – मुलाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कुख्यात गुंड बंडू आंदेकर टोळीने सुडापोटी रिक्षा चालकावर गोळीबार करीत कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यापार्श्वभूमीवर आता आंदेकर टोळीविरूद्ध पुणे पोलिसांनी आणखी कठोर निर्णय घेतला आहे. कुटूंबियांना भेट न देणे, आरोपींना इतर आरोपीपासून दूर ठेवणे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर करणे, इतरांच्या भेटी बंद करण्यासाठी संबंधित विभागाला प्रशासनाने अर्ज केला आहे.
वेल्ह्यात हाॅटेल चालकासह कामगारावर गोळीबार – सविस्तर बातमी
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कुख्यात गुंड बंडू आंदेकरने गुन्ह्यातील आरोपींच्या नातलगांचे आतापर्यंत दोन खून केले आहे. तसेच एकाचा खूनाचा प्रयत्न केला असल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कारागृह प्रशासन, न्यायालयासह संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला आहे. आंदेकर टोळीचा इतरांसोबतचा संवाद कमी करण्यासाठी नातलगांना भेट न देणे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर करणे, बहुतांश आरोपींना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात डांबणे, आरोपी एकमेकांच्या संपर्कात येणार नाही, याची तजवीज करण्यात आली आहे. विशेषतः बंडू आंदेकर याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिले आहे.
मुलाच्या हत्येने आंदेकरकडून खुनसी बदला
नागरिकांवर दहशत माजवून खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यात कुख्यात गुंड बंडू आंदेकरविरूद्ध तब्बल ५ मोक्का कारवाई आहेत. त्याअनुषंगाने त्याला कारागृहात डांबण्यात आले आहे. मात्र, मुलगा वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने गुन्ह्यातील आरोपींच्या लहान मुलांपासून मोठ्यावर हल्ला केला जात आहे. त्यामुळे आरोपीचे इतर नातलगही आता दहशतीखाली आहेत.





















