Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

इलेक्ट्रीक दुकानातून वायरीचे बंडल, रोकड चोरी

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – इलेक्ट्रीक साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी वायरीचे बंडल, गल्ल्यातील रोकड असा दोन पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इलेक्ट्रीक साहित्य विक्रेत्याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक स्मारकात चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील डोमखेल रस्त्यावर तक्रारदाराचे गणेशाय हे इलेक्ट्रीक साहित्य विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी २५ मे रोजी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटला. दुकानात ठेवलेले इलेक्ट्रीक वायरचे २५ बंडल आणि गल्ल्यातील पाच हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरुन नेला. चोरलेल्या वायरच्या बंडलची किंमत दोन लाख रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.

बिबवेवाडीत तरुणाला लुटले

बिबवेवाडी परिसरात ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या एका तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करतो. २४ मे रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तरुण बिबवेवाडी परिसरातून निघाला होता. त्या वेळी दोघांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील पार्सल, कानातील सोन्याची बाळी, मोबाइल संच असा मुद्देमाल हिसकावून नेला. सहायक पोलीस फौजदार एस. डी. गायकवाड तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावणे, तसेच पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी धनकवडीत एकाला धमकावून २५ लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×