Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

सावधान…. सुट्ट्यांमध्ये बंद घरे चोरट्यांच्या रडारवर

नागरिकांनी सजग राहण्याचे अंबाजोगाई शहर पोलिसांचे आवाहन

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – उन्हाळी सुटी, जत्रा आणि इतर कारणांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सुट्टीच्या काळात बंद घरांना लक्ष्य करून होणाऱ्या गुन्ह्यांचा धोका लक्षात घेता, पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी नियमावली जाहीर केली असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे सूचना दिल्या आहेत.

वजनावरून टोमणे, उपाशी ठेवत महिलेचा केला छळ – सविस्तर बातमी 

नागरिकांनी बाहेरगावी जाताना घराला व्यवस्थित कुलूप लावावे आणि शक्य असल्यास डबल लॉकचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घर बंद राहणार असल्यास त्याची कल्पना विश्वासू शेजारी किंवा नातेवाईकांना देऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवावी. तसेच, सोशल मीडियावर प्रवासाचे बेत किंवा ‘घर बंद आहे’ अशी माहिती पोस्ट करणे टाळावे, कारण यामुळे गुन्हेगारांना आयते निमंत्रण मिळू शकते. घरात मोठ्या प्रमाणात रोकड किंवा दागिने न ठेवता ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत आणि घर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी, असे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे. गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे. घरात कामगार, वॉचमन किंवा भाडेकरू ठेवताना त्यांची पोलीस पडताळणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींकडून खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत आणि बस, रेल्वेमध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले असून ‘सजग नागरिक, सुरक्षित समाज’ ही संकल्पना राबवून सुरक्षिततेची जबाबदारी सामूहिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×