Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

पुण्यात तडीपार आरोपींना अटक, पिस्तूलांसह काडतुसे जप्त

काळेपडळ पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – तडीपार असतानाही शहरात येउन शस्त्रास्त्र बाळगणार्‍या आरोपींना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, चार मॅगझीन, चार जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. आकाश संतोष भारती (वय २७ रा. महंमदवाडी रोड) दीपक राम बिस्ट (वय २० हडपसर) गणेश बबन लोंढे (वय २५ रा. पांढरे मळा, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अरण्येश्वरमध्ये तरूणावर वार, एकाला अटक – सविस्तर बातमी

काळेपडळ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर, महादेव शिंदे यांना तडीपार आरोपी शस्त्रास्त्र बाळगून थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एपीआय अमित शेटे, उपनिरीक्षक विनायक गुरव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांना माहिती दिली. हेवनपार्क ते लक्ष्मी पार्ककडे जाणार्‍या रस्त्यावर सापळा रचून आकाश भारती व दीपक बिस्ट यांना ताब्यात घेतले. मात्र, अंधाराचा फायदा घेउन आरोपी गणेश लोंढे पसार झाला. दोघा आरोपींकडून पिस्तूल, मॅगझीन, दोन राउंड जप्त केले.

पसार झालेला गणेश लोंढे याला ४ जूनला ताब्यात घेउन त्याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन, दोन राउंड असा शस्त्रसाठा जप्त केला. त्यांनी हे शस्त्र कोठून आणले, कोणावर हल्ला करणार होते, याचा तपास करण्यात येत आहे. ही कामगिरी उपायुक्त जीवन बेनीवाल, एसीपी अतुल नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाउद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले. सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, गिरीराज जगदाळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×