Breking News
बिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारानारायणगाव, पारगावात सोनसाखळी चोरीसह दागिन्यांची लूट करणाऱ्या टोळीला अटक‘दाऊद’च्या नावाने उपसंचालकासह कुटुंबियांना मारण्याची धमकी

‘दाऊद’च्या नावाने उपसंचालकासह कुटुंबियांना मारण्याची धमकी

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीचे नाव घेऊन रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या उपसंचालकांसह त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी डीआरआयचे उपसंचालक अभिषेक कुमार सिंह (वय ३३, रा. बोट क्लब) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दुबईहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले काही लॅपटॉप आणि मोबाईल कस्टम विभागाला सांगून सोडवले नाही, या कारणास्तव ही धमकी देण्यात आली आहे. विमानतळ पोलिसांनी मुस्ताक शेख नामक व्यक्तीसह अन्य एका जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मार्केट यार्डातील दुकानातून वेलदोडे, रोकड चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे प्रादेशिक युनिट, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) येथे २०२४ पासून उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. सिंह हे त्यांच्या मूळ गावी जात असताना, ३ मे रोजी मुस्ताक शेख याने त्यांना फोन करून मी तुमचा बातमीदार मेहमूद याला ओळखतो, मी तुमच्याकडे बातमीदार म्हणून काम करण्यास इच्छूक असल्याचे सांगत, मला तुमच्यासोबत बोलायचे आहे असे सांगितले. त्यावेळी सिंह यांनी आपण नंतर बोलू असे त्याला कळवले. त्यानंतर ५ मे रोजी रात्री त्याने पुन्हा संपर्क साधून मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने पकडलेल्या एका लॅपटॉप व मोबाईलसंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलून मदत करण्याची मागणी केली. फिर्यादींनी त्यास नकार दिला. त्यानंतर मुस्ताक शेख याने ६ मे रोजी सिंह यांच्या व्हॉट्सअपवर १३ व्हॉईस नोट्स पाठवून त्यांना धमकी दिली. ‘तुम्ही मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटला माहिती दिल्याने माझ्या लोकांवर कारवाई झाली आहे. मी ३० वर्षांपासून तस्करीच्या व्यवसायात आहे. मला कोणी थांबवू शकले नाही.

माझे गुन्हेगारांशी संबंध आहेत. तुम्ही व तुमची फॅमिली पुणे शहरातून बाहेर कशी पडते ते बघतो, तुम्हाला चांगला धडा शिकवतो. मी तुझी पीएम ऑफिस येथे तक्रार करणार आहे. माझे ३० वर्षांपासून कस्टमशी संबंध आहेत’ असे म्हटले होते. त्यानंततर पुन्हा अन्य मोबाईल नंबरवरून सिंह यांना ‘मी गेल्या ३ दशकांपासून दाऊद इब्राहीम, डी कंपनी सिंडिकेटसाठी काम करतो. मी एटीएस साठी एक परिचित चेहरा आहे, असे सांगत सिंह व त्यांच्या डीआरआय कार्यालयाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, सहायक पोलिस निरीक्षक अशोक शिरसाठ हे पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×