बारामती शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-हनुमंत पाटील
marathinews24.com
बारामती – एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या निर्देशानुसार एमआयडीसी परिसरात उघड्यावर कचरा टाकताना आढळून आलेल्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ‘स्वच्छ बारामती-सुंदर बारामती’ या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच शहर कचरामुक्त ठेवण्यास हातभार लावावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून सुनेचा छळ – सविस्तर बातमी
श्री. पाटील म्हणाले, एमआयडीसी परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी नगरपरिषदेच्या मार्शल पथकाकडून नियमित पाहणी करण्यात येत आहे. यावेळी नागरिक, व्यापारी व उद्योजकांनी कचरा निर्धारित ठिकाणीच टाकावा, उघड्यावर कचरा टाकून परिसर अस्वच्छ करू नये, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
नगरपालिकेच्यावतीने आवाहन
शहरात उघड्यावर कचरा टाकणे, रस्त्याच्या कडेला कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण २ हजार ७०० दंड पावत्या करण्यात आल्या असून संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गुन्ह्याच्या स्वरूपानुसार १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारण्यात येत आहे.
नागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीमध्येच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये. शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले आहे.





















