बीड : धारूरमध्ये दारुड्याकडून वृद्धाला बेदम मारहाण

मारहाण करून विहिरीत टाकण्याचा प्रयत्न

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील धारुर मधील चिंचपुर रोडवरील शेतामध्ये ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला दारूड्याने दांड्याने , दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी शिवीगाळ केली. अमानूष मारहाण करून मृत झाल्याचे समजून विहिरीत टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र अमानूष मारहाण करणारा आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून सुनेचा छळ – सविस्तर बातमी

शेतातील वायर बाजूला काढण्याच्या किरकोळ कारणावरून किरण शिनगारेने दारूच्या नशेत भारत नांदे (वय ६५, रा.धारूर) वृद्धाला लाकडी दांड्याने आणि दगडाने शिवीगाळ करत बेदम मारहाण करत पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले. मृत झाल्याचे समजताच विहिरीत टाकण्याचा प्रयत्न केला. बाजूच्या शेतातील नागरिकांना वृद्धांचा आरडा ओरडा केल्याचा आवाज आल्याने शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सोडवासोडवी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मारहाणीत जखमी झालेल्या वृध्द शेतकऱ्यांला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक प्रकाराने परिसरात संतापाची लाट उसळली असून वृद्धांच्या नातेवाईकांकडून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत मारहाण करणाऱ्या दारुड्याला अटक करून वृध्द शेतकऱ्याला न्याय देणार का? असा सवाल नागरिकांतून विचारले जात आहे.

पोलिसांत गुन्हा नोंद

संबंधित अमानूष मारहाण झालेल्या वृध्द शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून किरण शिनगारे या आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता बी एन एस.२०२३ नुसार धारूर पोलीस ठाण्यात कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी या प्रकरणातील अरोपी अद्याप मोकाट असल्याने संबंधित वृद्ध शेतकऱ्यांच्या जीवीतास धोका असल्याने पोलिसांकडून आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे पोलीसांच्या कारकिर्दीवरील प्रश्न ऐरणीवर आला असून बीड मध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×