Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीवर केला बलात्कार, गुन्हा दाखल

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

रजिस्टर पध्दतीने केलेले लग्न नाकारुन तरुणीला जातीवाचक शिवीगाळ

marathinews24.com

पुणे – तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करून बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नोंदणी पद्धतीने तरुणीशी विवाह केल्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी १० ते १२ लाख उपनिरीक्षकाने घेतले. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर त्याने विवाह नाकारुन तिला जातीवाचक शिवीगाळ केली. गर्भपात करण्यास भाग पाडले, असे पीडित तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक विराज गावडे (वय ३२, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा), त्याचा भाऊ कुणाल, तसेच वडील गजानन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात हॉटेल – लॉज मालकांची झाडाझडती – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज गावडे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना २०२० मध्ये त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. ही बाब त्याने कुटुंबीय, मित्रांपासून लपवून ठेवली. पीडित तरुणीला पत्नीप्रमाणे दर्जा दिला नाही. तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा कुटुंबीयांना विवाहाबद्दलची माहिती देतो, असे सांगून विराजने पीडितेकडून वेळोवेेळी १० ते १२ लाख रुपये घेतले. त्याने तरुणीशी संबंध ठेवले.

आरोपी विराजची उपनिरीक्षकपदी निवड झाली. पीडित तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. कुटुंबीयांशी ओळख करुन दे, तसेच विवाहाची माहिती त्यांना दे, अशी विनंती तिने केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. ‘माझे कुटुंबीय माझ्याशी स्थळ पाहत आहेत. तू खालच्या जातीची आहे. आपला विवाह कुटुंबीय मान्य करणार नाही. माझा विचार सोडून दे’, असे त्याने तिला सांगितले. त्याने तरुणीला भेटण्यास टाळाटाळ केली. त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणालने त्याला साथ दिली. मला वडिलांच्या जागेवर चंद्रपूरात नोकरी मिळणार होती. विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली. आज मला नोकरीही नाही, तसेच विराजने माझी फसवणूक केली. मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×