Breking News
माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला मानवंदनाकै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरतीशुभम आव्हाळे ठरला ‘साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६’चा विजेतामुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कतापुण्यातील नाना पेठेत वाड्याची भिंत कोसळली, ३ दुचाकींचे नुकसानमिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरचविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करावेपुण्यात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, टेम्पो चालकाचा वाचवला जीवनिम्मी बोपोडी पाण्यात; उपमहापौर परशुराम वाडेकर धावले नागरिकांच्या मदतीलाबेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या आधुनिक धान्य गोदामाचे उद्घाटन; शेतकऱ्यांना वैज्ञानिक साठवणुकीची सुविधा

बांधकाम कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

क्रेडिट कार्डद्वारे 11 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बांधकाम कंपनीत नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.
याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादातून रिक्षा चालकाच्या डोक्यात कुंडी घातली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूड भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. बांधकाम कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांनी बांधकाम कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी एक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी तीन लाख सात हजार रुपये जमा केले. नोकरीबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल बंद असल्याचे दिसून आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राऊत तपास करत घालत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×