Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला मानवंदना

माऊलींच्या मानाच्या अश्वांची 'दगडूशेठ' गणपतीला मानवंदना

गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश; विश्वस्त कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन

marathinews24.com

पुणे – माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… गणपती बाप्पा मोरया अशा गणेशभक्तांनी केलेल्या जयघोषाने झालेल्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत अनोखी मानवंदना दिली. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरती – सविस्तर बातमी 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकतें यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार) तसेच पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते.

शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे. तर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले.

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा हरित वारी, स्वच्छता अभियान, अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल. दरम्यान, माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… गणपती बाप्पा मोरया अशा गणेशभक्तांनी केलेल्या जयघोषाने झालेल्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत अनोखी मानवंदना दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×