Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी

सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

marathinews24.com

बारामती – तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या बारामतीच्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गौरव – सविस्तर बातमी

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी बाबुजी नाईक वाडा येथील विकास कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. परिसरातील विहिरीच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. नदीपात्रातील जलपर्णी काढून परिसर स्वच्छ राहील, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.

रुई-जळोची ओढा संरक्षण भिंतीच्या कामकाजाची माहिती घेवून आपत्तीच्या व्यवस्थापनाच्यादृष्टीने नवीन चार पुलाचे बांधकाम सुरु करावे. उर्वरित संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश श्रीमती पवार यांनी दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×