Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

निगडे खुर्द,केळंद, पिशवी, करणावडमधील २०० विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य; महिलांना १०० छत्र्यांचे वाटप

marathinews24.com

पुणे – तोरणा आणि राजगडाच्या कुशीत वसलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाताना अडचणी येऊ नयेत, तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. निगडे खुर्द येथे झालेल्या या उपक्रमात केळंद, पिशवी आणि करणावड या डोंगरदऱ्यांतील गावांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊ आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरातील महिलांना १०० छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभ – सविस्तर बातमी

डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन दुर्गम प्रतिष्ठानने हा उपक्रम आयोजित केला. विद्यार्थ्यांना रेनकोट आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिलांनाही छत्र्या देण्यात आल्याने त्यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रेनकोट, तर महिलांनी छत्र्यांचा वापर करून पावसापासून बचाव केला. त्यामुळे वाटप करण्यात आलेल्या साहित्याची उपयुक्तता कार्यक्रमस्थळीच अधोरेखित झाली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रसाद खंडागळे, अध्यक्ष नंदकुमार जाधव, तसेच स्वाती शेठ आणि संतोष पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी श्रीकांत मोरे, सुनंदा मोरे, रश्मी जाधव, अश्विनी शेळके, स्वाती वाडेकर, सुनील जगताप, रवींद्र पठारे, विजय जगताप, गणेश काळे, शांताराम वाडेकर, सिद्धेश जाधव, दिलीप तायडे, संजय ऐलवाड , रुपेश कोळस आणि प्रतीक कोंढाळकर यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थितांसाठी बेसन-भाकरीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि पावसाळ्यात आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×