चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १७ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटी, तसेच वडगाव बुद्रुक भागातील सोसायटीत घरफाेडीच्या घटना घडल्या. याबाबत एकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिलिव्हरी बाॅयच्या डोक्यात बाटली फोडून रोकड लुटली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे प्रभात रस्त्यावर राहायला आहेत. दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटीत त्यांची सदनिका आहे. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड, साेन्याचे दागिने असा पावणे अकरा लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.
वडगाव बुद्रुक भागातील रघुनंदन हाॅल परिसरात असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील चोरट्यांनी ५ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे ॲक्वारा प्राईड सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शिरकुळे तपास करत आहेत.



















