Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार, मांजरीतील घटना

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

चालकाविरूद्ध मांजरी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव कंटेनर चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना २५ ऑगस्टला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मांजरी ते फुरसुंगी रस्त्यावरील जय मल्हार हॉटेलजवळ घडली आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरूद्ध मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रतन सदाशिव हरिहर (वय ५० रा. महादेवनगर, मांजरी बुद्रूक) असे ठार झालेल्याचे नाव आहे. अरुण झा (वय ४० रा. बिहार याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर हरिहर (वय ३८ रा. मांजरी यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दारूच्या नशेत मांसाहारी जेवणाच्या वादातून मुलाचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन हरिहर हे मांजरी परिसरात राहायला होते. २५ ऑगस्टला ते रस्त्याने पायी जात असताना कंटेनरचालक अरुण झा याने त्यांना धडक दिली. त्यामुळे रतन हे गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक अरुण झा हा घटनास्थळावरुन पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चव्हाण तपास करीत आहेत.

सायबर चोरट्याने जेष्ठाला घातला २२ लाखांचा गंडा

मोफत पेन्शन कार्ड मिळत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला तब्बल २२ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉल करीत आयसीआयसीआय बँक लोगो वापरुन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १८ ऑगस्टला कसबा पेठेतील पवळे चौकात घडली आहे. याप्रकरणी ८१ वर्षीय नागरिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, कसबा पेठेत राहायला आहेत. १८ ऑगस्टला सायबर चोरट्याने त्यांना व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला. त्यासाठी चोरट्याने आयसीआयसीआय बँक लोगो वापरुन तक्रारदाराला मोफत पेन्शन कार्ड मिळत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉल करुन मोबाइलमधील संबंधित अ‍ॅप उघडण्यास भाग पाडले. विविध ठिकाणी क्लिक करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातील २२ लाख रुपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश महाला तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×