Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दारूच्या नशेत मांसाहारी जेवणाच्या वादातून मुलाचा खून

दुभाजकावर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू भरधाव

पुण्यातील आई-वडिलांना अटक, वारजे माळवाडीतील घटना

marathinews24.com

पुणे – दारू पिऊन घरी आल्यांनतर सतत मांसाहारी जेवण मागितल्याच्या रागातून आई- वडिलांनी मुलाच्या डोक्यात, तोंडावर मारहाण करून खून केला आहे. ही घटना २४ ऑगस्टला वारजे माळवाडी परिसरातील रामनगरात घडली आहे. याप्रकरणी दाम्पत्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, वडिलांना अटक केली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांना अटक केली आहे. गणेश भागवत गायकवाड (वय ३४, सर्व रा. रामनगर, वारजे माळवाडी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पुणे- पिंपरीतील दारूकांडातील मुख्य आरोपी जेरबंद – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड कुटूंबिय वारजे माळवाडीतील रामनगरात राहायला आहे. २४ ऑगस्टला रात्री महेश दारू पिऊन घरी गेला होता. त्यावेळी त्याने मांसाहारी जेवण मागून आई-वडीलांसोबत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर वडिल भागवतने मुलगा महेशच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली. महेशचा गळा दाबण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर महेशचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

शवविच्छेदनात महेशचा गळा दाबून व डोक्यात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. भाऊ व नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली. त्यानंतर महेशचा खून वडिलांनी केल्याचे स्पष्ट झाले. मारहाणीत सांडलेले रक्त आईने पुसून टाकल्याप्रकरणी तिलाही अटक करण्यात आली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळी उपायुक्त डॉ. सागर कवडे, एसीपी सुजाता तानवडे, पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×