Breking News
Pune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणका

Jagar Arogyacha : बारामतीत विद्यार्थ्यांसाठी ‘जागर आरोग्याचा-मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमांतर्गत विशेष चर्चासत्र

Jagar Arogyacha

मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

marathinews24.com

बारामती – Jagar Arogyacha : नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्देशानुसार आयोजित या चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती – सविस्तर बातमी 

चर्चासत्रात नशामुक्ती, मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध, निरोगी जीवनशैली, युवकांचे सक्षमीकरण, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारताच्या संकल्पनेतील युवकांचे योगदान या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना तंबाखू, मद्य आणि अमली पदार्थांच्या व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच अभ्यासाचा ताण, परीक्षेची भीती, चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच मदत व समुपदेशन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मानसिक तणावाचा सामना करणाऱ्या मित्रांना योग्य मदत करणे, संकटातील व्यक्तींची लक्षणे ओळखणे आणि गरज भासल्यास व्यावसायिक मदत घेणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग, पुरेशी झोप आणि स्क्रीन टाइमचे योग्य नियोजन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. याशिवाय युवकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी, स्वयंसेवेची भावना आणि राष्ट्रनिर्मितीतील सक्रिय सहभाग विकसित करण्यावर भर देण्यात आला. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. (Jagar Arogyacha) या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, व्यसनमुक्त, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिक भान जपणारे युवक घडविण्यास या उपक्रमातून प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास डॉ.पाटील यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×