आरोपीला जमावाने चोपले; कात्रजमधील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – Katraj Molestation Case : तरुणीची छेड काढून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज परिसरातील सुख सागरनगरात घडली आहे. मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणीशी आरोपीने गैरवर्तन केले. तिचा शर्ट ओढून तिला उचलण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुखसागर नगर मधील विद्यानगर परिसरात समर्थ डेअरी जवळ घडली.
पुण्यात धावत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव बचावला – सविस्तर बातमी
जितू किशोरिलाल सरोज ( ३०, मूळ रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश; सध्या रा. कात्रज, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. तरुणी मैत्रिणीची वाट पाहत असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. तिचा शर्ट ओढून तिला उचलण्याचा प्रयत्न केला. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली. (Katraj Molestation Case) घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून, तो कात्रज परिसरात भावासोबत राहतो. त्याने यापुर्वी गावाकडे असे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जात आहे. – सुदर्शन गायकवाड(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ)
























