Breking News
Fake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडलेPune Bike Theft Case : पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्तPune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जPune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडाST Bus Theft Pune : एसटी प्रवासात महिलेचा ऐवज चोरलाPratidhwani Book Launch Pune : ‘प्रतिध्वनी’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; ‘स्मृतींचा मागोवा’ मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेKatraj Molestation Case : पुण्यात तरुणीची छेड काढून पळवून नेण्याचा प्रयत्नPune Agriculture Department : पुणे जिल्ह्यात रब्बी ज्वारी लागवडीला कृषी विभागाचे प्रोत्साहन

Pratidhwani Book Launch Pune : ‘प्रतिध्वनी’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; ‘स्मृतींचा मागोवा’ मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले

Pratidhwani Book Launch Pune

जानी विश्वनाथ लिखित ‘प्रतिध्वनी’ या मराठी पुस्तकाचे माई पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशन

marathinews24.com

पुणे – Pratidhwani Book Launch Pune : साहित्य, कविता आणि संगीत यांचा सुरेल संगम साधणारा ‘प्रतिध्वनी’ पुस्तक प्रकाशन सोहळा आणि त्यानिमित्त आयोजित ‘स्मृतींचा मागोवा’ या विशेष काव्य-संगीत मैफिलीचा कार्यक्रम रविवारी पुण्यात उत्साहात पार पडला. जानी विश्वनाथ लिखित आणि ‘Echoes of Light’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या ‘प्रतिध्वनी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माई पब्लिकेशन्सच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगरच्या अपर जिल्हाधिकारी मा. मोनिका सिंग होत्या, तर प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

काळी आई वाचवायला हवी;तरच पुढची पिढी टिकेल-पद्मश्री राहीबाई पोपेरे – सविस्तर बातमी 

प्रमुख पाहुणे वैभव जोशी यांनी आपल्या भाषणात ‘प्रतिध्वनी’ या पुस्तकाविषयीं बोलताना अंधाऱ्या वाटेवरून जाताना मशालीसारखा उजेड दाखवणारं हे पुस्तक आहे असं सांगून पुस्तकाची ओळख करून दिली. माणसं आपल्यापर्यंत पोचवणारं ळ, रंग-चव-दृश्य-गद्य-पद्य यांचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या संग्रहात माणूस जिवंत करण्याचं कसब आहे असं सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. मोनिका सिंग यांनी पुस्तकातील कथा आणि कविता उलगडत मनातल्या विस्मृतीत गेलेल्या भावना आणि स्वतःलाही कधी न विचारलेले प्रश्न मांडणारं देखणं आणि संवेदनशील पुस्तकं मराठीत आलं याबद्दल प्रकाशन संस्था आणि लेखिका जानी विश्वनाथ यांचे कौतुक केले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित ‘स्मृतींचा मागोवा’ या विशेष मैफिलीने कार्यक्रमात काव्य आणि संगीताची सुरेल रंगत भरली. (Pratidhwani Book Launch Pune) सुप्रसिद्ध कवी व गीतकार वैभव जोशी आणि प्रसिद्ध गझलकार ममता सपकाळ यांनी कविता वाचनातून रसिकांना साहित्यिक आनंद दिला. ऋषिकेश रानडे आणि अंजली मराठे यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी मैफिलीला विशेष रंगत आणली. कार्यक्रमाचे निवेदन समीरा गुजर-जोशी यांनी केले.

पुस्तक प्रकाशन आणि काव्य-संगीत मैफिलीच्या माध्यमातून साहित्य, कविता, गझल आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. साहित्यप्रेमी आणि संगीत रसिकांसाठी हा सोहळा सांस्कृतिक मेजवानी ठरला. माई पब्लिकेशन्सच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशनाबरोबरच साहित्य आणि संगीताच्या अभिव्यक्तीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×