गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील ऐवज लंपास केला
marathinews24.com
पुणे – ST Bus Theft Pune : एसटी प्रवास करणार्या महिलेच्या पर्समधील १० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा मिळून २ लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. ही घटना २२ ऑक्टोबरला सकाळी नउ ते साडेअकराच्या सुमारास सानपाडा ते नवले ब्रीज पुणे एसटी प्रवासात घडली आहे. याप्रकरणी दत्तनगरात राहणार्या ५८ वर्षीय महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात तरुणीची छेड काढून पळवून नेण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये राहायला आहे. २२ ऑक्टोबरला महिला सानपाडा ते नवले पुल असा एसटीतून प्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील १० हजारांची रोकड, (ST Bus Theft Pune) सोन्याचे दागिने असा ऐवज चोरुन नेला. महिलेला दागिने, रोकड नसल्याचे लक्षात आल्यानंत त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार हरिष गायकवाड तपास करत आहेत.
पादचारी महिलेचा मोबाइल हिसकावला
रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या हातातील ३५ हजारांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना २४ ऑक्टोबरला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास चंदन नगर मधील भारत पेट्रोल पंपासमोर घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हर्षल घागरे तपास करत आहेत.























