फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी महिलेला गुडघ्याच्या ऑपरेशन साठी मदतीचा बहाणा केला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करुन तब्बल २६ लाख ३० हजार रूपये ऑनलाईनरित्या गंडा घातला आहे. ही घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी फुरसुंगीत घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एसटी प्रवासात महिलेचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला फुरसुंगीत राहायला असून, १० ऑक्टोबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपण तामिळनाडूचे मुख्यमंत्री असून, तुमच्या गुडघ्याच्या ऑपरेशनासाठी मदत करतो, अशी बतावणी केली. सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे टॅक्स भरावे लागतील असे सांगितले. टॅक्सच्या नावाखाली तब्बल २६ लाख ३० हजार रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. (Pune Online Scam) फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.
पेन्शनकार्ड काढून देण्याच्या नावाखाली जेष्ठेची फसवणूक
पेन्शनकार्ड काढून देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला तब्बल १० लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ५ ते २४ ऑक्टोबर २०२६ कालावधीत वडाचीवाडी रोड, उंड्री परिसरात घडली आहे. याप्रकरणी ७२ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारक चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर तपास करत आहेत.
























