शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला खराडी पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – Pune Bike Theft Case : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणार्या आरोपीला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणून ५ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये खराडीतील दोन, कोथरूड, डेक्कन, विमानतळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. जगजितसिंग कुलदीपसिंग काठोडे (वय ४४, रा. आदर्शनगर, लोहगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
खराडी परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी खराडी पोलीस गुन्ह्याचा तपास करताना आरोपी लोहगाव परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपास पथकाने जगजितसिंग याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणांहून ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यामध्ये खराडी ठाण्यातील दोन, कोथरूड, डेक्कन, विमानतळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, एसीपी सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, उपनिरीक्षक गणेश घुले, उपनिरीक्षक तेजस मगर, महेश नाणेकर, श्रीकांत कोद्रे, कमलेश पाटील, गणेश गिरी यांनी केली.
























