पुण्यातील हडपसर, सहकारनगरमध्ये महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा...

दुचाकीस्वार चेनस्नॅचर चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस पथकांना आली मरगळ

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, पादचारी महिलांसह जेष्ठ महिलांना लक्ष्य करीत लुटमार केली जात आहे. त्यामुळे घराबाहेर पडावे की नाही, असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. त्यातच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांना आलेली मरगळ चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रासहित सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याची चोरट्यांची हिम्मत वाढली आहे. पोलिसांकडून दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध कारवाई केली जाणार की नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विमानाने पुण्यात येऊन जबरी चोरी करणाऱ्या सराईतांना अटक – सविस्तर बातमी

रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना ३१ मे रोजी रात्री साडेनउच्या सुमारास हडपसरमधील मांजरी बुद्रूक परिसरातील कलाश्री बॅक्वेट हॉलजवळ घडली आहे.

याप्रकरणी मुंढव्यात राहणार्‍या ५७ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, रिक्षाची वाट पाहत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.

पतीसोबत पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटना १ जूनला रात्री सव्वा आठच्या सुमारास सहकारनगरमधील वाळवेकरनगरात घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय जेष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वार चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार जेष्ठ महिला वाळवेकरनगरात राहायला असून, १ जूनला रात्री सव्वाआठच्या सुमारास पतीसोबत पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने जेष्ठेच्या गळ्यातील सव्वा लाख रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले.

याप्रकरणी दाम्पत्याने आरडाओरड करेपर्यंत चोरटा सुसाट पसार झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजनुसार वाहन क्रमांकाच्या आधारे चोरट्याचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार तपास करीत आहेत.

पोलिसांना गांभीर्य आहे की नाही

दुचाकीस्वार चोरट्यांनी शहरभर हैदोस माजविलेला असतानाही, ना स्थानिक पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढला जात आहे. ना गुन्हे शाखेच्या पथकांकडून आरोपींची मोडस ऑपरेंडी तपासून काढली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलांसह पादचारी जेष्ठ महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबत दुचाकीस्वार चोरट्यांच्या वाढलेल्या हिंमतीमुळे पादचारी महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याबाबतीत पोलिसांना गांभीर्य आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×