Breking News
Jyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्या

सासूने हुंड्यासाठी छळले, सुनेने गळफास घेउन केली आत्महत्या

हांडेवाडी रस्ता, सातवनगरातील घटना

marathinews24.com

पुणे –  लग्नात मानपान कमी केल्याच्या रागातून सासूने सुनेचा छळ करीत तिच्या कुटूंबियाकडून हुंड्यासाठी तगादा लावला होता. सततच्या छळाला आणि त्रासाला कंटाळून सुनेने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना २० जूनला दुपारी बाराच्या सुमारास हांडेवाडी रस्ता, सातवनगरात घडली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी सासूविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ओढे- नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती; संबंधितांवर होणार कारवाई – सविस्तर बातमी

द्वारका जाधव (वय ६२) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. दीपिका प्रमोद जाधव (वय २९ रा. ड्रीम एलिगन्स सोसायटी, सातवनगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची मुलगी दीपिका आणि प्रमोद यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर दीपिकाची सासू द्वारकाने जाच सुरू केला. लग्नात चांगला मानपान केला नाही, हुंडा दिला नाही म्हणून छळ सुरू केला. सतत टोमणे मारून दीपिकाचा अपमान करीत जाच केला.

सततच्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून २० जूनला दीपिकाने राहत्या घरातील पंख्याच्या हुकाला गळफास घेउन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×