मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांची उपस्थिती
marathinews24.com
मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी क्षेत्रातील भक्कम कार्य करणारे नेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवार दिनांक १ जुलैला अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे होणार अनावरण – सविस्तर बातमी
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री आशिष शेलार यांच्यासह विधानसभेतील आणि विधान परिषदेतील अनेक आमदारांनी उपस्थित राहून वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आदरपूर्वक स्मरण करत सर्व मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श आजच्या राजकारणातही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. कार्यक्रमादरम्यान परिसरात अनुशासनबद्ध वातावरण असून, राज्याच्या या थोर नेत्यास कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन विधिमंडळ सचिवालय व राजेश राठोड यांनी केले होते.
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या जाण्याने समाजकारणाचे मोठे नुकसान – डॉ. गोऱ्हे यांची भावना
मावळ तालुक्याचे माजी आमदार, ‘शिक्षणमहर्षी’ म्हणून ओळखले जाणारे थोर समाजसेवक आणि लोकनेते मा. कृष्णराव भेगडे यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भेगडे सर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व होते, असे डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे. “त्यांचे योगदान केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजकारणाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली करत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले,” असेही त्या म्हणाल्या.
डॉ. गोऱ्हे यांनी भेगडे सरांच्या कार्याची आठवण काढताना सांगितले की, “राजकीय मतभेद असले तरीही समाजविकासासाठी समन्वयाने काम करण्याची त्यांची वृत्ती विशेष होती. पुणे जिल्ह्यातील राजकारणात सामंजस्य आणि सुसंवादाचे वातावरण राखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.भेगडे सरांची राजकीय कारकीर्द जनसंघापासून सुरू होऊन दोन वेळा आमदार आणि एकदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून उल्लेखनीय ठरली.
भेगडे सर यांचे निधन म्हणजे एक अनुभवी, कर्तृत्ववान, आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचे दुःखद नुकसान आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल,” असे गौरवोद्गार काढत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली.