Breking News
पुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजन

बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर परिसरात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोपाळ गोविंद वाघ (वय ६३, रा. एनपी अटलाँटिस सोसायटी, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत वाघ यांचा मुलगा अमितकुमार (वय ३५) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमसंबंधास विरोध केल्याने मामावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ वाघ हे २० जुलै रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बाणेरमधील बालेवाडी फाटा भागातून निघाले होते. त्या वेळी न्यू पूना बेकरीसमोर भरधाव रिक्षाने वाघ यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता रिक्षाचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या वाघ यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यना त्यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक केकाण तपास करत आहेत.

पाषाण परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एक पादचारी महिला जखमी झाली आहे. याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला पाषाणमधील विघ्नहर्ता चौकातून २० जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिली. अपघातात महिलेचा हात फ्रॅक्चर झाला. सहायक पोलीस फौजदार काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×