Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रोकड लांबवून नोकर पसार

बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रोकड लांबवून नोकर पसार

कामगाराविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली ३ लाखांची रोकड लांबवून नोकर पसार झाल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी कामगाराविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ऋषीकेश सोनी (वय ३८, रा. भार्गव पॅलेस, वडगाव बुद्रुक) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बिरेंद्र राम (वय ४०, रा. वारजे) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूडमध्ये चौघांवर केला प्राणघातक हल्ला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, सोनी यांचेवारजे भागातील तपोधाम परिसरात दुकान आहे. सोनी यांनी नोकर बिरेंद्र याला गुरुवारी (२४ जुलै) बँँकेत भरणा करण्यासाठी तीन लाखांची रोकड दिली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास बिरेंद्र रोकड घेऊन दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर तो पसार झाला. तो दुकानात न परतल्याने त्याचा शोध घेतला. सायंकाळपर्यंत बिरेंद्र दुकानात न आल्याने सोनी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.

शनिवारवाडा परिसरात ज्येष्ठ महिलेची फस‌वणूक

ज्येष्ट महिलेकडील बतावणी करुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने फरासाखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गणेश पेठेतील दूधभट्टी परिसरात राहायला आहेत. त्या गुरुवारी (२४ जुलै) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास छत्रपती शिवाजी रस्त्यावरील प्रेमळ विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘शनिवारवाडा परिसरात ज्येष्ठ नागरिकांना भोजन आणि पैसे वाटप करण्यात येत आहे. अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा. तुम्ही पण जेवण करा,’ अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतविले. त्यांच्याकडील ३५ हजारांची सोन्याची पोत लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×