Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

मिलेटरीमध्ये कामाला असल्याची केली बतावणी

Pune Crime News

महिलेला १ लाख ४० हजारांचा गंडा

marathinews24.com

पुणे – मिलेटरीमध्ये कामाला असल्याची केली बतावणी – सायबर चोरट्याने महिलेला त्यांच्या फ्लॅट खरेदी करणार असल्याची बतावणी केली. तिचा विश्वास संपादित करून तब्बल १ लाख ४० हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना २२ जूनला कोंढव्यातील पारगेनगरात घडली आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मार्केटयार्डातील एमटीएम साईटवरील घटना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील पारगेनगरात राहायला असून, सायबर चोरट्याने महिलेला फोन केला. आपण मिलेटरीमध्ये कामाला असून, महिलेचा फ्लॅट खरेदी करणार असल्याची बतावणी केली. त्यासाठी आरोपीने महिलेला आधारकार्ड, इतर कागदपत्रे पाठवून विश्वास संपादित केला. त्यानंतर विविध कारणांसाठी आरोपीने महिलेकडून १ लाख ४० हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करीत आहेत.

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार; वाघोलीत साबळेवाडीतील घटना

भरधाव टेम्पा चालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. हा अपघात २६ जुलैला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वाघोलीतील गाडे वस्ती चौकात घडला आहे. सौरभ शैलेश वाळुंज वय २३ असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याचा भाउ शुभम वाळुंज वय २५ यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकाविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सौरभ वाळुंज हा २६ जुलैला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वाघोलीतील गाडे वस्ती चौकातून जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पो चालक (एमएच १० झेड ३३७५) याने सौरभच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडून तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान सौरभचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×